PAPMOCHANI EKADASHI VRAT KATHA /
पापमोचनी एकादशी व्रत कथा
प्राचीन काळात चैत्ररथ नावाचे अतिशय सुंदर वन होते. एकदा या वनामध्ये देवराज इंद्र गंधर्व कन्यां, अप्सरा आणि देवंतासोबत स्वच्छन्द विहार करत होते. त्या वनात च्यवन ऋषिचा मेधावी नावाचा पुत्र तपस्या करत होता. ऋषि शिवभक्त आणि अप्सरा शिवद्रोही कामदेवाचे अनुचारी होते.
एकदा कामदेवने द्वेषा मध्ये येऊन ऋषि मेधावीची तपस्येत विघ्न आणण्याचा विचार केला. तपस्या भंग करण्यासाठी कामदेवाने मंजुघोषा नावाच्या अप्सराला पाठवले. तिने तिच्या नृत्य आणि गाण्यामुळे ऋषिची तपस्या भंग केली. अप्सरेचे नृत्य आणि रूप बघून ऋषि तिच्यावर मोहित झाले आणि तिच्यासोबत फिरू लागले. भरपूर वर्ष सोबत राहिले. एक दिवस जेव्हा मंजुघोषाने जाण्यासाठी आज्ञा मागितली तेव्हा ऋषीनें तिला थांबण्यास सांगितले. तेव्हा अप्सरा मंजुघोशाने त्यांना वेळेचे कल्पना दिली. तेव्हा त्यांना समजले कि ५७ वर्ष निघून गेले आहे.
तेव्हा ऋषिला अप्सरा काळाप्रमाणे वाटली. त्यांनी क्रोधीत होऊन तिला पिशाचनी होण्याचा श्राप दिला. श्राप ऐकून मंजुघोषा भयभीत झाली आणि ती ऋषींना प्रार्थना करू लागली कि यातून बाहेर निघण्याचा काही मार्ग सांगा. नंतर ऋषि मेघावी यांना तिची दया आली. आणि त्यांनी तिला सांगितले कि, " जर तू पापमोचनी एकदाशीचे विधिवत व्रत करशील तर तुला पाप आणि श्रापापासून मुक्ती भेटेल. आणि तुला तुझे पूर्वीचे रूप वापस भेटेल.'' अप्सराला अस सांगून ऋषि त्यांचे पिता च्यावन ऋषिंच्या आश्रमात निघून गेले.
ऋषीनें त्यांच्या पित्याला सगळे कथानक सांगितले. तेव्हा च्यवन ऋषीने त्यांना सांगितले कि, ''पुत्र तू हे काय अनर्थ केला. श्राप देऊन तू तुझे सगळे पुण्य क्षिण केले. म्हणून तू पण पापमोचनी एकदाशीचे व्रत कर.''
अश्याप्रकारे अप्सरा मंजुघोषाने श्राप आणि ऋषि मेघावी ने पापपासून मुक्ती मिळवली. पापमोचनी एकादशी चे व्रत केल्याने सगळे पाप नष्ट होतात.
READ MORE:-
No comments:
Post a Comment