KAMADA EKADASHI VRAT KATHA /
कामदा एकादशी व्रत कथा
एकदा धर्मराज युधिष्टिर ने भगवान श्रीकृष्णला प्रार्थना केली की, 'हे महाराज! मला चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्व सांगा.' तेव्हा भगवान श्रीकृषानाने सांगितले कि ,' हे राजा ! एकदा महर्षी वशिष्टी ने महाराज दिलीपला जी कथा सांगितली होती तीच मी आता तुम्हाला सांगतो.'
भरपूर वर्ष आधीची गोष्ट आहे. रत्नपूर नावाचा एक राज्य होते. तेथे एक श्रीमंत राजा पुंडरीक राज्य करत होता. रत्नपूर राज्यात अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व राहत होते. तेथे ललित आणि ललिता नावाचे पतीपत्नी राहत होते. त्या दोघाम्ध्ये अत्यंत प्रेम होते. ते दोघे एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते.
एके दिवशी राजा पुंडरीकच्या सभेमध्ये सर्व गन्धर्वांसोबत ललित गाण गात होता. गाण गाता असतांना ललितला ललिताची आठवण आली त्यामुळे त्याचे सूर बिघडले. ललितच्या मनातल ओळखून कर्कोट नावाच्या नागाने गान बिघडल्याच कारण सांगितलं. तेव्हा पुंडरीकला क्रोध आला व तो बोलला की, ' तू माझ्या समोर गात असतांना तुझ्या स्त्रीच स्मरण करत आहे म्हणून तू कच्चामास आणि मनुष्य खाणारा राक्षस बनशील आणि आपल्या कर्माचे फळ भोगशील.' राजा पुंडरीकच्या श्रापामुळे ललित त्याचवेळी राक्षस बनला. त्याच मुख अत्यंत भयन्कर नेत्र, सूर्य आणि चान्द्रम्सारखे आणि तोंडातून अग्नी निघू लागली. डोक्याचे केस पर्वतावर असलेल्या वृक्षाप्रमाणे आणि हात खूप लांब झाले. तो राक्षस बनल्यावर अनेक कष्ट सहन करत वनामध्ये भटकू लागला. त्याची स्त्री दुखी होऊन त्याच्या मागे भटकू लागली. ती सदैव तिच्या पतीला या श्रापाप्सून मुक्ती मिळवण्याचा विचार करू लागली.
एक दिवस तिच्या पतीच्या मागे फिरत असतांना ती विंध्याचल पर्वतावर श्रुंगी ऋषीच्या आश्रमात पोहचली. श्रुंगी ऋषि ललिताला बघुन विचारले,' हे देवी! तु कोन आहेस आणि येथे कशासाठी आल आहेस ?' तीने सांगितले की,' हे मुनिवर ! माझ नाव ललिता आहे. माझा पती राजा पुंडरीक याच्या श्रापामुळे भयंकर आणि विशाल राक्षस बनला आहे. याच मला फार दुख आहे. माझ्या पतीच्या उद्धारासाठी काही उपाय सांगा.' ऋषिने सांगितले की ,' हे गंधर्व कन्या! आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे. जिच नाव कामदा एकादशी आहे. त्याच व्रत केल्यामुळे माणसाचे सगळे कार्य सिद्ध होतात. जर तू कामदा एकदशी का व्रत करून त्याच पुण्य तू तुझ्या पतीला दिलास तर राजापासून मिळालेल्या श्रापापासून त्याला मुक्ती भेटेल.'
चैत्र शुक्ल एकादशी आल्यावर लालीताने व्रत केले आणि द्वादशी ब्राम्हणांच्या समोर आपल्या व्रताचे फळ आपल्या पतीला देऊन देवाला प्रार्थना केली की ,' हे प्रभू ! मी हे व्रत केले त्याच फळ माझ्या पतीला भेटो त्यामुळे तो राक्षस योनीतून मुक्त होईल'. एकादशीचे फळ देताच तिचा पती त्याच्या मूळ रुपामध्ये वापस आला. त्यानंतर ते एका दिव्य विमानावर बसून स्वर्गात निघून गेले.
श्रीकृष्णाने संगीतले की, ' हे राजन! हे व्रत विधीपूर्वक केल्याने सगळया पापाचे नाश होते. तसेच राक्षस योनीतून आपण सुटून जातो. संसारात याच्या सारखा दुसरा व्रत नाही.'
समाप्त
READ MORE:-
No comments:
Post a Comment