Sunday, 29 March 2015

GANESH CHATURTHI VRAT KATHA

GANESH CHATURTHI VRAT KATHA/
गणेश चतुर्थी व्रत कथा


एकदा भगवान शिवशंकर स्नान करायला कैलास पर्वतावरून भोगावतीला गेले. भगवान शिवशंकर स्नानासाठी गेल्यावर देवी पार्वतीने शरीराचा मैल कडून त्याचा एक पुतळा बनवला आणि त्यात जीव टाकले. देवी पार्वतीने त्या पुतळयाच नाव गणेश ठेवले.
देवी पार्वतीने गणेशजींना सांगितले की, ''हे पुत्र! तू एक मुद्गर गेऊन दाराजवळ जाऊन पहार दे. मी आतमध्ये स्नान करते. मी जेव्हा पर्यन्त स्नान करून येत नाही तेव्हा पर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नको.'' अस सांगून देवी पार्वती आत स्नान करायला गेली.
भगवान शंकर थोड्यावेळाने भोगावतीत स्नान करून वापस आले. ते घराच्या आत प्रवेश करायला गेले तर त्यांना गणेशजी ने दारातच थांबवले. भगवान शंकर गणेशजीनां सांगू लागले की , 'मी देवी पार्वतीचा पती आहे. मला कोणाच्या परवानगी आवशकता नाही. तरीही गणेशजीने भगवान शंकराला आत प्रवेश करू दिले नाही. भगवान शंकर अपमान झाल्यामुळे क्रोधीत झाले आणि त्यांनी गणेशाजीचा डोकं धडापासून वेगळ केलं ते आत निघून गेले. आत आल्यावर  पार्वतीने भगवान शंकरांना क्रोधीत बघितले. त्यांना वाटल कि भोजनास विलंब झाल म्हणून भगवान शंकर क्रोधीत आहे. म्हणून त्यांनी लवकर भोजन वाढून भगवान शंकरांना भजनास आमंत्रित केलं.
दोन ताटात भोजन बघुन भगवान शंकरांनी देवी पार्वतीला विचारलं की दुसर ताट कोणाच आहे. पार्वतीने सांगितलं कि बाहेर जो माझा मुलगा गणेश  पहारा देत आहे त्याच्या साठी आहे. हे ऐकूण भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. आणि देवी पार्वतीला बोलले की, 'तुझा पुत्र गणेश पहारा देत आहे? पण त्याने मला आत येण्यास मनाई केली त्यामुळे मी त्याचं डोक शरीरापासून वेगळ करून त्याच जीवन समाप्त केलं.'
हे ऐकून देवी पार्वती खूप दुखी झाली. आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वी नष्ट करणार असे सागितले. त्यानंतर भगवान ब्रम्हा पार्वतीला संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्यासाटी थांबवण्यास आले. तेव्हा देवी पार्वतीने भगवान शंकरला त्यांच्या पुत्राला पुनर्जीवन देण्यास सांगितले. तेव्हा पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवने अस सांगितलं कि जो कोणी त्यांना पहिल्यांदा दिसेल त्याच डोक ते आणून  बालकाच्या शरीराला जोडतील आणि त्याला जीवन देतील. नंतर ते विष्णू सोबत पृथ्वीवर गेले. त्यांना एक छोटा हत्ती दिसला. त्यांनी त्या हत्तीच डोक आणून त्या बालकाच्या शरीराला जोडले. आपल्या पुत्र पुनर्जीवित बघुन देवी पार्वती खुश झाली.
हि घटना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाली होती. म्हणून भाद्रपद शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हंटले जाते. गणेशला विनायक विघ्नहर्ता असेही म्हंटले जाते. म्हणून प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हंटले जाते.

READ MORE:-

No comments:

Post a Comment