KALASHTMI VRAT KATHA /
कालाष्टमी व्रत कथा
कालाष्टमी व्रत कथा
एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रम्हा यामध्ये विवाद झाला कि त्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ किं आहे. ते त्यांच समाधान करायला भगवान शंकराकडे गेले. त्यांनी एक सभा आयोजित केली. तेथे सगळे ज्ञानी, ऋषी -मुनी संत उपस्थित होते. भगवान शिव ने श्री विष्णूला आणि ब्राम्हंजीना समजवले. श्रीहरी विष्णूना भगवान शिवजिंने सांगितलं ते पटल. परंतु ब्रम्हाजी संतुष्ट झाले नाही. ते भगवान शंकरांचा अपमान करू लागले. त्यामुळे भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्यांनी रौद्र रूप धारण केलं.
भगवान शंकरांचे रौद्र रूप बगून सगळे भयभीत झाले. त्यांनाच भगवान भैरव म्हंटले आहे. ते कुत्र्यावर बसले होते. त्यांच्या हातामध्ये एक दांडू होता. भगवान भैरवाचं रूप भयंकर होत. त्यांनी ब्राम्हंजीच्या पाच पैकी एक डोक कापलं. तेव्हा पासून ब्रम्हाजीनां चार डोक आहेत. त्याचं रूप बघून भगवान ब्रम्हाजीनां त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी त्यांना माफी मागितली.तसेच सगळ्या देवी देवतांनी आणि साधू संतानी वंदना केल्यानंतर भगवान भैरव शांत झाले.
READ MORE:-
No comments:
Post a Comment