GUDI PADAVA
GUDI PADAWA /
गुडीपाडवा
गुडीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र महिना म्हणजेच मराठी नव वर्ष सुरु होत. गुडीपाडवा चैत्र शुध्द प्रतिपदेला साजरा करतात. गुडीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे.
गुडीपाडवा या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून सूर्योदयपूर्वी घरासमोर गुडी उभारली जाते. असे मानले जाते कि ब्रम्ह देवाने या दिवशी विश्वनिर्मिती केली. म्हणून गुढी उभारायची असे म्हंटले जाते. तसेच याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या अयोध्या वासियांनी दाराला तोरण बांधून आणि गुडी उभारून श्री रामाचे स्वागत केले होते.
गुडी उभारण्यासाठी वेळूची काठी स्वच्छ धुऊन, एखादे कोरे कापड, आब्यांची किवां कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. आणि त्यावर ताब्यांचा किवां चांदीचा तांब्या पालथा ठेवतात. मग अशीच सजवलेली गुडी घराच्या दाराशी सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत लावतात. नवीन वर्षाच स्वागत करतात.
गुडी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजा केली जाते. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, सोन्याची खरेदी, नव्या व्यवसायाची सुरवात केली जाते. याला साडेतीन मुहूर्त पैकी एक मानला जाते.
READ MORE:-
No comments:
Post a Comment