आमलकी एकादशी /फाल्गुन शुक्ल एकादशी
आमलकी एकादशी होळीच्या ४ दिवस आधी फाल्गुन शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे. या एकादशीला फाल्गुन शुक्ल एकादशी असेही म्हंटले जाते. या एकादशीला भगवान विष्णूची आमला ( आवळा) ने पूजा केली जाते. आणि दिवसभर उपास ठेवून फक्त आवळ्या पासून बनवलेले पदार्थ खातात. अस म्हंटल जाते कि या दिवसात आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास राहतो. ज्याप्रकारे सगळ्या देवांमध्ये भगवान विष्णू स्थान आहे त्याच प्रकारे आवळ्याला सर्व शास्त्रामध्ये स्थान आहे. भगवान विष्णूने अस सांगितलं आहे कि जो प्राणी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीची कामना ठेवतो त्यांनी फाल्गुन शुक्ल पक्षामधील पुष्य नक्षत्रात येणारी एकादशी च्या दिवशी व्रत करावे. त्या एकादशीला आमलकी एकादशी म्हंटले जाते.
No comments:
Post a Comment