Tuesday, 31 March 2015

GANGAUR PUJA

GANGAUR PUJA/
गणगौर पूजा 

गणगौर हा सण राजस्थान मध्ये स्त्रिया फार उत्साहाने साजरा करतात. 'गणा' म्हणजे भगवान शंकर आणि 'गौरी' म्हणजे देवी पार्वती. म्हणून या दिवशी भागवान शंकर आणि गौरी म्हणजे पार्वतीची पूजा करतात. या दिवशी कुमारिका चांगला पती भेटण्यासाठी गौरी ची पूजा करतात आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीसाठी चांगले स्वास्थ आणि दीर्घायुष्य साठी प्रार्थना करतात.

READ MORE:-






KAMADA EKADASHI VRAT KATHA

KAMADA EKADASHI VRAT KATHA / 
कामदा एकादशी व्रत कथा 

एकदा धर्मराज युधिष्टिर ने भगवान श्रीकृष्णला प्रार्थना केली की, 'हे महाराज! मला चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्व सांगा.' तेव्हा भगवान श्रीकृषानाने सांगितले कि ,' हे राजा ! एकदा महर्षी वशिष्टी ने महाराज दिलीपला जी कथा सांगितली होती तीच मी आता तुम्हाला सांगतो.' 
भरपूर वर्ष आधीची गोष्ट आहे. रत्नपूर नावाचा एक राज्य होते. तेथे एक श्रीमंत राजा पुंडरीक राज्य करत होता. रत्नपूर राज्यात अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व राहत होते. तेथे ललित आणि ललिता नावाचे पतीपत्नी राहत होते. त्या दोघाम्ध्ये अत्यंत प्रेम होते. ते दोघे एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते. 
एके दिवशी राजा पुंडरीकच्या सभेमध्ये सर्व गन्धर्वांसोबत ललित गाण गात होता. गाण गाता असतांना ललितला ललिताची आठवण आली त्यामुळे त्याचे सूर बिघडले. ललितच्या मनातल ओळखून कर्कोट नावाच्या नागाने गान बिघडल्याच कारण सांगितलं. तेव्हा पुंडरीकला क्रोध आला व तो बोलला की, ' तू माझ्या समोर गात असतांना तुझ्या स्त्रीच स्मरण करत आहे म्हणून तू कच्चामास आणि मनुष्य खाणारा राक्षस बनशील आणि आपल्या कर्माचे फळ भोगशील.' राजा पुंडरीकच्या श्रापामुळे ललित त्याचवेळी राक्षस बनला. त्याच मुख अत्यंत भयन्कर नेत्र, सूर्य आणि चान्द्रम्सारखे आणि तोंडातून अग्नी निघू लागली. डोक्याचे केस पर्वतावर असलेल्या वृक्षाप्रमाणे आणि हात खूप लांब झाले. तो राक्षस बनल्यावर अनेक कष्ट सहन करत वनामध्ये भटकू लागला. त्याची स्त्री दुखी होऊन त्याच्या मागे भटकू लागली. ती सदैव तिच्या पतीला या श्रापाप्सून मुक्ती मिळवण्याचा विचार करू लागली.
एक दिवस तिच्या पतीच्या मागे फिरत असतांना ती विंध्याचल पर्वतावर श्रुंगी ऋषीच्या आश्रमात पोहचली. श्रुंगी ऋषि ललिताला बघुन विचारले,' हे देवी! तु कोन आहेस आणि येथे कशासाठी आल आहेस ?' तीने सांगितले की,' हे मुनिवर ! माझ नाव ललिता आहे. माझा पती राजा पुंडरीक याच्या श्रापामुळे भयंकर आणि विशाल राक्षस बनला आहे. याच मला फार दुख आहे. माझ्या पतीच्या उद्धारासाठी काही उपाय सांगा.' ऋषिने सांगितले की ,' हे गंधर्व कन्या! आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे. जिच नाव कामदा एकादशी आहे. त्याच व्रत केल्यामुळे माणसाचे सगळे कार्य सिद्ध होतात. जर तू कामदा एकदशी का व्रत करून त्याच पुण्य तू तुझ्या पतीला दिलास तर राजापासून मिळालेल्या श्रापापासून त्याला मुक्ती भेटेल.'
चैत्र शुक्ल एकादशी आल्यावर लालीताने व्रत केले आणि द्वादशी ब्राम्हणांच्या समोर आपल्या व्रताचे फळ आपल्या पतीला देऊन देवाला प्रार्थना केली की ,'  हे प्रभू ! मी हे व्रत केले त्याच फळ माझ्या पतीला भेटो त्यामुळे तो राक्षस योनीतून मुक्त होईल'. एकादशीचे फळ देताच तिचा पती त्याच्या मूळ रुपामध्ये वापस आला. त्यानंतर ते एका दिव्य विमानावर बसून स्वर्गात निघून गेले.
श्रीकृष्णाने संगीतले की, ' हे राजन! हे व्रत विधीपूर्वक केल्याने सगळया पापाचे नाश होते. तसेच राक्षस योनीतून आपण सुटून जातो. संसारात याच्या सारखा दुसरा व्रत नाही.'
समाप्त 


READ MORE:-


  

KAMDA EKADASHI

KAMDA EKADASHI / 
कामदा एकादशी 


कामदा एकादशीला चैत्र शुक्ल एकादशी असेही म्हणतात. चैत्र नवरात्र संपल्यानंतर शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला कामदा एकदशी म्हणतात. हे एकदाशीचे व्रत केल्यास आपले सगळ्या कामना पूर्ण होतात असे मानले जाते म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असे म्हंटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ची पूजा केली जाते. आणि गरिबांना दान दिले जाते.

READ MORE:-


Monday, 30 March 2015

BHAGWAT EKADASHI

BHAGWAT EKADASHI /
भागवत एकादशी 


फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या  एकादशीला पापमोचणी एकादशी म्हणतात.  हे व्रत केल्यामुळे सगळ सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच सगळे  पाप नष्ट होतात असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना केली जाते. 
या वर्षी पापमोचनी एकादशी फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात  दोन दिवस आली आहे. 
  • १६ मार्च(सोमवार ) :- पापमोचनी एकादशी (स्मार्त एकादशी)
  • १७ मार्च (मंगळवार ) :- पापमोचनी एकादशी (भागवत एकादशी

 
READ MORE:-



Sunday, 29 March 2015

GANESH CHATURTHI VRAT KATHA

GANESH CHATURTHI VRAT KATHA/
गणेश चतुर्थी व्रत कथा


एकदा भगवान शिवशंकर स्नान करायला कैलास पर्वतावरून भोगावतीला गेले. भगवान शिवशंकर स्नानासाठी गेल्यावर देवी पार्वतीने शरीराचा मैल कडून त्याचा एक पुतळा बनवला आणि त्यात जीव टाकले. देवी पार्वतीने त्या पुतळयाच नाव गणेश ठेवले.
देवी पार्वतीने गणेशजींना सांगितले की, ''हे पुत्र! तू एक मुद्गर गेऊन दाराजवळ जाऊन पहार दे. मी आतमध्ये स्नान करते. मी जेव्हा पर्यन्त स्नान करून येत नाही तेव्हा पर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नको.'' अस सांगून देवी पार्वती आत स्नान करायला गेली.
भगवान शंकर थोड्यावेळाने भोगावतीत स्नान करून वापस आले. ते घराच्या आत प्रवेश करायला गेले तर त्यांना गणेशजी ने दारातच थांबवले. भगवान शंकर गणेशजीनां सांगू लागले की , 'मी देवी पार्वतीचा पती आहे. मला कोणाच्या परवानगी आवशकता नाही. तरीही गणेशजीने भगवान शंकराला आत प्रवेश करू दिले नाही. भगवान शंकर अपमान झाल्यामुळे क्रोधीत झाले आणि त्यांनी गणेशाजीचा डोकं धडापासून वेगळ केलं ते आत निघून गेले. आत आल्यावर  पार्वतीने भगवान शंकरांना क्रोधीत बघितले. त्यांना वाटल कि भोजनास विलंब झाल म्हणून भगवान शंकर क्रोधीत आहे. म्हणून त्यांनी लवकर भोजन वाढून भगवान शंकरांना भजनास आमंत्रित केलं.
दोन ताटात भोजन बघुन भगवान शंकरांनी देवी पार्वतीला विचारलं की दुसर ताट कोणाच आहे. पार्वतीने सांगितलं कि बाहेर जो माझा मुलगा गणेश  पहारा देत आहे त्याच्या साठी आहे. हे ऐकूण भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. आणि देवी पार्वतीला बोलले की, 'तुझा पुत्र गणेश पहारा देत आहे? पण त्याने मला आत येण्यास मनाई केली त्यामुळे मी त्याचं डोक शरीरापासून वेगळ करून त्याच जीवन समाप्त केलं.'
हे ऐकून देवी पार्वती खूप दुखी झाली. आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वी नष्ट करणार असे सागितले. त्यानंतर भगवान ब्रम्हा पार्वतीला संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्यासाटी थांबवण्यास आले. तेव्हा देवी पार्वतीने भगवान शंकरला त्यांच्या पुत्राला पुनर्जीवन देण्यास सांगितले. तेव्हा पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवने अस सांगितलं कि जो कोणी त्यांना पहिल्यांदा दिसेल त्याच डोक ते आणून  बालकाच्या शरीराला जोडतील आणि त्याला जीवन देतील. नंतर ते विष्णू सोबत पृथ्वीवर गेले. त्यांना एक छोटा हत्ती दिसला. त्यांनी त्या हत्तीच डोक आणून त्या बालकाच्या शरीराला जोडले. आपल्या पुत्र पुनर्जीवित बघुन देवी पार्वती खुश झाली.
हि घटना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाली होती. म्हणून भाद्रपद शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हंटले जाते. गणेशला विनायक विघ्नहर्ता असेही म्हंटले जाते. म्हणून प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हंटले जाते.

READ MORE:-

VINAYAK CHATURTHI

VINAYAK CHATURTHI / 
विनायक चतुर्थी


प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असते. चतुर्थीला भगवान गणेशाजीचां जन्म झाला होता. पौर्णिमा नंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी अस म्हंटले जाते. आणि अमावास्या नंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हंटले जाते.
तसे विनायक चतुर्थीचा व्रत प्रत्येक महिन्यात येतो. पण भाद्रपद महिन्यात येणारी विनायक चतुर्थी महत्वाची मानली जाते. या चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हंटले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशचा जन्म झाला होता. 

READ MORE:-





Tuesday, 24 March 2015

RAM NAVAMI

 SHREE RAM NAVAMI / 
श्रीराम नवमी



          भारतीय संस्कृतीतील '' श्रीराम नवमी '' हा एक महत्वाचा सण आहे. रामनवमी हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात नवव्या दिवशी म्हणजे नवमीला येतो. या दिवशी भगवान श्री रामाचा दुपारी 12 वाजता जन्म झाला होता. प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूचे मण्युष्य रुपातले सातवे अवतार मानले जातात. श्रीराम नवमी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात नवव्या दिवशी येतो म्हणून त्याला '' चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी ''असेही म्हंटले जाते. चैत्र नवरात्रीचा हा नववा दिवस आहे. 


      दक्षिण भारतात, भद्राचलम येथे श्रीराम नवमीला श्रीराम आणि सीता यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साज्रारा केला जातो. 

READ MORE:-


Monday, 23 March 2015

PAPMOCHANI EKADASHI VRAT KATHA

PAPMOCHANI EKADASHI VRAT KATHA / 
पापमोचनी एकादशी व्रत कथा 

प्राचीन काळात चैत्ररथ नावाचे अतिशय सुंदर वन होते. एकदा या वनामध्ये देवराज इंद्र गंधर्व कन्यां, अप्सरा आणि देवंतासोबत स्वच्छन्द विहार करत होते. त्या वनात च्यवन ऋषिचा मेधावी नावाचा पुत्र तपस्या करत होता. ऋषि शिवभक्त आणि अप्सरा शिवद्रोही कामदेवाचे अनुचारी होते.
एकदा कामदेवने द्वेषा मध्ये येऊन ऋषि मेधावीची तपस्येत विघ्न आणण्याचा विचार केला. तपस्या भंग करण्यासाठी कामदेवाने मंजुघोषा नावाच्या अप्सराला पाठवले. तिने तिच्या नृत्य आणि गाण्यामुळे ऋषिची तपस्या भंग केली. अप्सरेचे नृत्य आणि रूप बघून ऋषि तिच्यावर मोहित झाले आणि तिच्यासोबत फिरू लागले. भरपूर वर्ष सोबत राहिले. एक दिवस जेव्हा मंजुघोषाने जाण्यासाठी आज्ञा मागितली तेव्हा ऋषीनें तिला थांबण्यास  सांगितले. तेव्हा अप्सरा मंजुघोशाने त्यांना वेळेचे कल्पना दिली. तेव्हा त्यांना समजले कि ५७ वर्ष निघून गेले आहे.
तेव्हा ऋषिला अप्सरा काळाप्रमाणे वाटली. त्यांनी क्रोधीत होऊन तिला पिशाचनी होण्याचा श्राप दिला. श्राप ऐकून मंजुघोषा भयभीत झाली आणि ती ऋषींना प्रार्थना करू लागली कि यातून बाहेर निघण्याचा काही मार्ग सांगा. नंतर ऋषि मेघावी यांना तिची दया आली. आणि त्यांनी तिला सांगितले कि, " जर तू पापमोचनी एकदाशीचे विधिवत व्रत करशील तर तुला पाप आणि श्रापापासून मुक्ती भेटेल. आणि तुला तुझे पूर्वीचे रूप वापस भेटेल.'' अप्सराला अस सांगून ऋषि त्यांचे पिता च्यावन ऋषिंच्या आश्रमात निघून गेले.
ऋषीनें त्यांच्या पित्याला सगळे कथानक सांगितले. तेव्हा च्यवन ऋषीने त्यांना सांगितले कि, ''पुत्र तू हे काय अनर्थ केला. श्राप देऊन तू तुझे सगळे पुण्य क्षिण केले. म्हणून तू पण पापमोचनी एकदाशीचे व्रत कर.''
अश्याप्रकारे अप्सरा मंजुघोषाने श्राप आणि ऋषि मेघावी ने पापपासून मुक्ती मिळवली. पापमोचनी एकादशी चे व्रत केल्याने सगळे पाप नष्ट होतात. 

READ MORE:-

PAPMOCHANI EKADASHI

PAPMOCHANI SMART EKADASHI / 
पापमोचनी स्मार्त एकादशी

फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या  एकादशीला पापमोचणी एकादशी म्हणतात.  हे व्रत केल्यामुळे सगळ सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच सगळे  पाप नष्ट होतात असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना केली जाते. 
या वर्षी पापमोचनी एकादशी फाल्गुन  महिन्यातल्या कृष्ण पक्षात  दोन दिवस आली आहे. 

  • १६ मार्च(सोमवार ) :- पापमोचनी एकादशी (स्मार्त एकादशी)
  • १७ मार्च (मंगळवार ) :- पापमोचनी एकादशी (भागवत एकादशी


READ MORE:-
 

Saturday, 21 March 2015

GUDI PADAVA

GUDI PADAWA / 

गुडीपाडवा

 

 

गुडीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र महिना म्हणजेच मराठी नव वर्ष सुरु होत. गुडीपाडवा चैत्र शुध्द प्रतिपदेला साजरा करतात. गुडीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे.
गुडीपाडवा या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून सूर्योदयपूर्वी घरासमोर गुडी उभारली जाते. असे मानले जाते कि ब्रम्ह देवाने या दिवशी विश्वनिर्मिती केली. म्हणून गुढी उभारायची असे म्हंटले जाते. तसेच याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या अयोध्या वासियांनी दाराला तोरण बांधून आणि गुडी उभारून श्री रामाचे स्वागत केले होते.
गुडी उभारण्यासाठी वेळूची काठी स्वच्छ धुऊन, एखादे कोरे कापड, आब्यांची किवां कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. आणि त्यावर ताब्यांचा किवां चांदीचा तांब्या पालथा ठेवतात. मग अशीच सजवलेली गुडी घराच्या दाराशी सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत लावतात. नवीन वर्षाच स्वागत करतात.


गुडी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजा केली जाते. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, सोन्याची खरेदी, नव्या व्यवसायाची सुरवात केली जाते. याला साडेतीन मुहूर्त पैकी एक मानला जाते. 
READ MORE:-




KALASHTMI VRAT KATHA

KALASHTMI VRAT KATHA / 
कालाष्टमी व्रत कथा 

         एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रम्हा यामध्ये विवाद झाला कि त्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ किं आहे. ते त्यांच समाधान करायला भगवान शंकराकडे गेले. त्यांनी एक सभा आयोजित केली. तेथे सगळे ज्ञानी, ऋषी -मुनी संत उपस्थित होते. भगवान शिव ने श्री विष्णूला आणि ब्राम्हंजीना समजवले. श्रीहरी विष्णूना भगवान शिवजिंने सांगितलं ते पटल. परंतु ब्रम्हाजी संतुष्ट झाले नाही. ते भगवान शंकरांचा अपमान करू लागले. त्यामुळे भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्यांनी रौद्र रूप धारण केलं.
           भगवान शंकरांचे रौद्र रूप बगून सगळे भयभीत झाले. त्यांनाच भगवान भैरव म्हंटले आहे. ते कुत्र्यावर बसले होते. त्यांच्या हातामध्ये एक दांडू  होता. भगवान भैरवाचं रूप भयंकर होत. त्यांनी ब्राम्हंजीच्या पाच पैकी एक डोक कापलं. तेव्हा पासून ब्रम्हाजीनां चार डोक आहेत. त्याचं रूप बघून भगवान ब्रम्हाजीनां त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी त्यांना माफी मागितली.तसेच सगळ्या देवी देवतांनी आणि साधू संतानी वंदना केल्यानंतर भगवान भैरव शांत झाले.  

READ MORE:-







KALASHTAMI

KALASHTAMI / कालाष्टमी

          कालाष्टमीला '' काला अष्टमी '' असेही म्हंटले जाते. कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी म्हणजे आठव्या दिवशी येते. या दिवशी भगवान भैरव यांची पूजा करतात. आणि दिवसभर उपास ठेवतात. मार्गशीष  महिन्यात येणाऱ्या कालाष्ट्मिला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान शिव भैरव रुपात प्रकटले होते. म्हणून काल्ष्ट्मिला पूजा केल्यास हव असलेल फळ मिळते अस मानले जाते. त्यात मार्गशीष महिन्यातली कालाष्टमी फार महत्वाची आहे. कालाष्टमी च्या दिवशी भगवान भैरवांच्या सोबत देवी कालिकामाता ची पूजा केली जाते. 




Friday, 20 March 2015

EKNATH SHASHTI

EKNATH SHASHTI / 
एकनाथ षष्टी


          १६ व्या शतकात संत एकनाथ होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ एकनाथ षष्ठी हा मंगल दिवस समर्पित केला जातो. एकनाथ षष्ठीला संत एकनाथ षष्ठी असेही म्हंटले जाते. हा दिवस फाल्गुन कृष्ण पक्षात सहाव्या दिवशी येतो. या दिवशी संत एकनाथांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती.संत एकनाथ दत्तात्रय यांचे भक्त होते. त्यांनी चातुर्श्लोकी भागवत संग्रहित केलं आहे. 


READ MORE:-

SOMPRADOSH VRAT KATHA

SOMPRADOSH VRAT KATHA/सोमप्रदोष व्रत कथा

          आधीच्याकाळी एक ब्राम्हण स्त्री तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भिक्षा मागत होती. ती सकाळी आपल्या मुलाला घेऊन भिक्षा मागायला जायची आणि संध्याकाळी परत यायची. एक दिवस तिला विदर्भ देशाचा राजा मिळाला. त्याच्या पित्याला शास्त्रूंनी मारून त्याला राज्याबाहेर हाकलले होते. त्यामुळे तो इकडेतिकडे भटकत होता. त्या ब्राम्हण स्त्रीने त्याला आपल्या घरी नेले व त्याचे पालनपोषण केले.
          एक दिवस दोन्ही बालक बाहेर खेळत असतांना त्यांनी गंधर्व कन्यांना बघितले. ब्राम्हणचा मुलगा घरी परत आला पण तो राजकुमार तेथेच थांबून अंशुमती नावाच्या गंधर्वकन्ये सोबत बोलत बसला. दुसर्या दिवशी राजकुमार परत अंशुमती ला भेटायला गेले असता तेथे अंशुमती तिच्या माता  पिता सोबत त्याची वाट बघत बसली होती. ब्राह्मणी ऋषिंच्या आज्ञेनुसार प्रदोष व्रत करत होती.
        काही दिवसानंतर अंशुमतीच्या माता पिता ने राजकुमार ला म्हंटल की तू विदर्भ देशाचा राजा धर्मगुप्त आहे. आणि श्री शंकरजींच्या आज्ञेनुसार त्यांची पुत्री अंशुमतीचा विवाह त्याच्या सोबत करून देऊ. नंतर राजकुमार चा विवाह अंशुमती सोबत झाला. राजकुमार ने गंधर्व राजाच्या सेनेच्या सहायतेने विदर्भ देशावर राज्य केले. ब्राह्मणी च्या मुलाला मंत्री बनविल. हे सगळ ब्राम्हनीच्या प्रदोष व्रताच फळ भेटलं. तेव्हापासून हे प्रदोष व्रत संसारात प्रतिष्टीत आहे. 
READ MORE:-

Thursday, 19 March 2015

SOMPRADOSH

SOMPRADOSH /
सोमप्रदोष
      संध्याकाळच्या नंतर आणि रात्र होण्या आधीच्या वेळेला  प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रत महिन्यात दोनदा येते. पोर्णिमा सुरु झाल्यानंतर आणि अमावास्या सुरु झाल्यानंतर तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला येते. जर प्रदोष दिवस सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते. जो हे व्रत करतो त्याला संपत्ती चांगल स्वास्थ्य आणि आनंद भेटतो.

READ MORE:-

HOLI

HOLI /

होळी


     होळी हा सण फाल्गुन मधील पौर्णिमेला साजरा केला जातो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या सणाची तारीख दर वर्षी बदलत असते. सहसा मार्च किवां फेब्रुवारी या महिन्यात हा सण येतो. या सणानंतर वसंत ऋतू प्रारंभ किवां हिवाळ्याचा शेवट होतो अस मानले जाते. तसेच या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेत विसरून भेटतात आणि रंग खेळतात.या सणाला रंगाचा सन असेही म्हंटल जाते. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट्रात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन असे म्हंटले जाते.


        होळी या सणाची सुरवात होळी जाळून केली जाते. यासाठी होळीच्या दिवशी मोकळी जागा साफ केली जाते. मध्यभागी एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. संध्याकाळी होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीत सबंध नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.

     होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

READ MORE:-



AMLAKI EKADASHI VRAT KATHA

      
AMLAKI EKADASHI VRAT KATHA/
आमलकी एकादशी व्रत कथा
 

एक दिवस महाराज मांधातानी महर्षि वशिष्टीनां याचना केली की " हे मुनिवर जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात माझ्या वर कृपा दृष्टी करून मला अस एखाद व्रेत सांगा की ज्यामुळे माझे सर्व प्रकारे कल्याण होईल "          
महर्षि वशिष्टीनी त्यास असे सांगितले की "हे राजा, तसे सगळेच व्रत उत्तम आहेत पण आमलकी एकादशी हे व्रत सर्वात उत्तम आहे.फाल्गुन शुक्ल पक्षात येणाऱ्या या आमलकी एकादशी चे व्रत केले तर सगळे पाप नष्ट होतात. मी तुला व्रत कथा सांगतो"
एक वैदिक नावाचे राज्य होते. तेथे सगळ्याप्रकारचे म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असे लोक गुणगोवंद्याने राहत होते. तेथे नेहमी वेदांची पूजा होत होती. तेथे कोणी नास्तिक, पापी नव्हत. त्या नगरावर चैत्ररथ नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. सगळे नगरवासी भगवान विष्णू चे परम भक्त होते. त्यामुळे सगळे एकादशीचे व्रत नियमितपने करायचे.
प्रत्येक वर्षाप्रमाणे फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी आली. त्यादिवशी राजा आणि प्रजेने श्रद्धापूर्वक व्रत केलं. राजा त्याच्या प्रजेसोबत मंदिर मध्ये जाऊन कुंभाची स्थापना करुन धूप दीप नैवेद्य आणि पंचरत्न यांनी आवळ्याची पूजा केली. आणि सर्व लोक प्राथना करू लागले की "हे आमला, तुम्ही ब्रम्हाजी द्वारा उत्पन्न झाले आहात. तुम्ही सगळ्या पापांचा नाश करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार.तुम्ही माझा अर्ध्य स्वीकार करा. तुम्ही रामचंद्र कडून सन्मानित आहात. मी तुम्हाला प्रार्थना करतो कि तुम्ही माझ्या सगळ्या पापांचा नाश करा."
मंदिरामध्ये सर्वांनी रात्री जागरण केले. रात्री तेथे एक शिकारी आला तो अत्यंत पापी होता. तो आपल्या कुटुंबाचे पालन प्राण्यांची हत्या करून करायचा. त्या दिवशी त्याला एकही शिकार भेटली नाही. म्हणून त्याला उपाशी रहाव लागल. भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन शिकारी मंदिरात गेला. त्याने तेथे रात्र भर जागून एकादशीची व्रत कथा एकली. सकाळी आपल्या घरी जाऊन भोजन केले. काही दिवसानंतर त्या शिकारीची मृत्युं झाली.
आमलकी एकादशीचे व्रत आणि जागरण केल्यामुळे पुढच्या जन्मात त्याचा राजा विदूरथ कडे जन्म झाला. त्याच नाव वसुरथ ठेवलं होत. मोठा झाल्यावर तो चातुरंगिनी सेना आणि धन धान्य भरलेल्या हजार गावाचं रक्षण करत होता. तो तेजा  मध्ये सूर्याप्रमाणे कांतीम्ध्ये चंद्राप्रमाणे क्षमामध्ये पृथ्वी सारखा होता. तो अत्यंत धार्मिक सत्यवादी,कर्मवीर आणि विष्णू भक्त होता. प्रजेचं पालन, रोज यज्ञ, दान करणे हे त्याचा नित्य नियम होते. एके दिवशी राजा शिकार करायला वनात गेला आणि रस्ता भटकला. आणि एका वृक्षाखाली झोपून गेला. तेथे थोड्यावेळात काही आदिवासी लोक आले त्याने राजाला बघीतले व त्यांना वाटल की हा तोच राजा आहे ज्याने त्यांना नगराबाहेर काढले आहे आणि त्याच्या कुटुंबाला नष्ट केले. म्हणून ते आदिवासी त्या राज्याला शस्त्राने प्रहर करू लागले. पण ते शस्त्र राजाजवळ जाऊन नष्ट होत होते आणि ते शत्र उलटे आदिवासी केडे वापस येत होते. त्यामुळे आदिवासी घायाळ झाले होते.
थोड्यावेळाने राज्याल जाग आला. त्यावेळेस राज्याच्या शरीरातून एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली. त्या स्त्री च्या डोळ्यातून लाल अग्नी निघत होती. त्या दिव्य स्त्रीने आदिवासी लोकांना  मारून टाकले. राजा जेव्हा उठला तेव्हा त्याने आदिवासीना मेलेले बघून विचार करू लागला की  यानां कोणी मारलं. तेव्हा आकाशवाणी झाली ''हे राजा, या संसार मध्ये विष्णू भक्त असलेला तूझी कोण सहायता करेल'' त्या राजाल समजले कि त्याची सहायता कोणी केली.तो आपल्या राज्यात जाऊन सुखपूर्वक राज्य करू लागला.
महर्षि वसिष्ठ बोलले ''हे राजा, असे आमलकी एकादशीचे महत्व आहे.जो व्यक्ती याचे व्रत करेल,तो सगळ्या कार्यात सफल होईल.आणि त्याला विष्णूलोक प्राप्त होईल".
  
READ MORE:-

Tuesday, 17 March 2015

AMLAKI EKADASHI

आमलकी एकादशी /फाल्गुन शुक्ल एकादशी 

          आमलकी एकादशी होळीच्या ४ दिवस आधी फाल्गुन शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे. या एकादशीला फाल्गुन शुक्ल एकादशी असेही म्हंटले जाते. या एकादशीला भगवान विष्णूची आमला ( आवळा) ने पूजा केली जाते. आणि दिवसभर उपास ठेवून फक्त आवळ्या पासून बनवलेले पदार्थ खातात. अस म्हंटल जाते कि या दिवसात आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास राहतो. ज्याप्रकारे सगळ्या देवांमध्ये भगवान विष्णू स्थान आहे त्याच प्रकारे आवळ्याला सर्व शास्त्रामध्ये स्थान आहे. भगवान विष्णूने अस सांगितलं आहे कि जो प्राणी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीची कामना ठेवतो त्यांनी फाल्गुन शुक्ल पक्षामधील पुष्य नक्षत्रात येणारी एकादशी च्या दिवशी व्रत करावे. त्या एकादशीला आमलकी एकादशी म्हंटले जाते.



READ MORE:-

MARCH 2015




फाल्गुन शके १९३६ 
चैत्र शके १९३७ 



READ MORE:-

  • जागतिक महिला दिन 
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे ) 
  • सावित्रीबाई फुले स्मृतिदिन 
  • जागतिक ग्राहक दिन 
  • शिवरात्री 
  • जागतिक हवामान दिन 
  • दुर्गाष्टमी 



HOME