Wednesday, 8 April 2015

SANKATNASHAN GANESH STOTR

SANKATNASHAN GANESH STOTR /
संकटनाशन गणेश स्तोत्र  


|| श्रीगणपतीस्तोत्र ||
साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका |
भक्तीने स्मरतां नित्य आयुःकामार्थ साधती ||१|| 
प्रथम नावं वक्रतुंड दुसरे एकदंत ते | 
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथें गजवक्र तें ||२|| 
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नावं तें | 
सातवे विघ्नराजेंद्र आठवें धूम्रवर्ण तें ||३|| 
नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक | 
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ||४|| 
देवानावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर | 
विध्नभिती नसे त्याला प्रभो ! तू सर्वसिद्धी दे ||५|| 
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | 
पुत्रार्थ्याला  मिळे पुत्र मोक्ष्यार्थ्याला मिळे गती ||६|| 
जपता गणपतीस्तोत्र सहा मासांत हे फळ | 
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७|| 
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | 
श्रीधराने मराठीत पाठण्या अनुवादिले ||८||  
||ओम गं गणपतये नमः ||


READ MORE:-

No comments:

Post a Comment