Wednesday, 8 April 2015

SANKASHT CHATURTHI VRAT KATHA

SANKASHT CHATURTHI VRAT KATHA /
संकष्ट चतुर्थी व्रत कथा 


एकदा भगवान विष्णू भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला चंद्रच दर्शन करतात म्हणून त्यांना भरपूर संकटाना सामोरे जावे लागते. कृष्ण भगवान यादवांचा राजा सत्राज्रीतानां भेटतात. सत्राज्रीत तपस्या केली  असतांना  सूर्य देव  प्रसन्न होऊन सत्राज्रीताला स्यमंतक मणी वरदान स्वरुपात देतात. त्या मणीची पूजा केली असता एक भार सोन त्याला प्राप्त होत असे. त्या अदभूत मणीमुळे सत्राजीताजवळ भारुपूर संपती असते. म्हणून तो ब्राम्हन भोजन, दान असे खूप करतात. म्हणून कृष्ण भगवान सत्राज्रीताला भेटतात आणि सांगतात कि हे मणी कदाचित सत्राज्रीताचा  नाश करेल म्हणून तो  मणी उग्रसेनला दयावा. पण सत्राज्रित त्यास नकार देऊन तो ते अद्भुत मनी स्वघरी घेऊन जातात. आणि ते तो मणी त्याचा बंधू प्रसेनला दिला.
प्रसेन आणि कृष्ण भगवान हे मित्र असतात. एकदा हे दोघे आपल्या मित्रांसोबत वनात शिकार करायाल जातात. प्रसेन शिकार करत असतांना थकल्यामुळे एका झाडाखाली आराम करायला थांबतो. रात्री त्या मण्याचे तेज बघून एक वाघ तेथे येतो आणि प्रसेन चा वध करतो. आणि तो सिंह तो मणी घेऊन जातो. सिंह मणी घेऊन जात असतांना अतिशय बलाढ्य जांबवान नावाचे अस्वल धावून येतो. हे जांबवान नावाचे अस्वल रामाचा भक्त असतो. जांबवान त्या सिंहाला मारून ते मणी सोबत घेऊन त्याच्या गुहेत जातो आणि त्याच्या मुलीला देतो. 
इकडे कृष्ण आपल्या मित्रांसोबत परत जातो. यादव नगरीत परत गेल्यावर कृष्णावर चोरीचा आळ आणतात कि कृष्णानेच प्रसेंनचा वध केला आहे आणि तो अद्भुत मणी चोराला आहे. चोरीचा आळ खोटा आहे सिद्ध करण्यासाठी कृष्ण त्यांच्या मित्रांसोबत परत वनामध्ये जातात. ते वनात फिरत असतांना त्यांना प्रसेन आणि त्याच्या घोड्याच्या वध झालेला दिसतो. आणि त्याच्या बाजूला सिंहाचे पदचिन्हे दिसतात. कृष्ण भगवान समजतात कि प्रसेनचा वध सिंहाने केला आणि तो मणी घेऊन गेला असावा म्हणून ते सिंहाच्या शोधात पुढे जातात. पुढे त्यांना सिंहाचा वध झालेला दिसतो. आणि त्याच्या बाजूला अस्वलाचे पदचिन्हे दिसतात.म्हणून त्यांना वाटते कि सिंहाला अस्वलाने मारले असावे आणि तो मणी घेऊन गेला असावा. म्हणून कृष्ण अस्वलाच्या शोधात पुढे जातात.
अस्वलाला शोधात असतांना कृष्ण एका गुहेच्या जवळ येतो. ते त्यांच्या मित्रांना तेथेच थांबवून गुहेच्या आत शिरतात. तेथे त्यांना जांबवान अस्वलाची मुलगी जांबवती एका पाळण्यात मणीला झोका देतांना दिसते. ते तिला सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा जांबवती कृष्णाला मणी देऊन लवकर निघून जायला सांगते. पण तेवढ्यात जांबवान अस्वल येतो. आणि जांबवान आणि कृष्ण सोबत युद्ध सुरु होतो. कृष्ण वापस आला नाही म्हणून त्याचे मित्र यादव नगरीत परत जातात. जांबवान आणि कृष्ण यांमध्ये २१ दिवस युद्ध करत होते. युद्ध करत असतांना जांबवान त्याच्या पूर्वजन्म बद्दल विचार करू लागतो. तेव्हा त्याला समजते कि एवढा प्रभावशाली हा पुरुष भगवान विष्णूच असावा. म्हणून तो युद्ध थांबवून कृष्णाला माफी मागतो आणि त्याला तो मणी परत देती. आणि कृष्णाला याचना करतो कि त्याचा पुत्रीचा  पत्नी म्हणून स्वीकार करावा. कृष्ण जांबवतीशी लग्न करून यादव नगरीत परतात आणि सत्राज्रीतला सगळी हकीकत कथन करतात व मणी परत देतात. सत्राज्रीत कृष्णाची माफी मागतो आणि त्याची मुलगी सत्यभामा सोबत विवाह करण्याची प्रार्थना केली. कृष्ण सत्यभामा सोबत विवाह करतो.
कृष्ण आणि सत्यभामा च लग्न झाल म्हणून साथथांवा, अक्रुरार, आणि किरुथावार्मार खुश नसतात. ते सत्राज्रिता वर क्रोधीत असतात. म्हणून ते अदभूत मणी चोरतात. हे वृतांत कळल्यावर कृष्ण भगवान यादव नगरीत परत येतात. साथाथांवा तो मणी अक्रुरार आणि किरुथावार्मार यांना देऊन पळून जातो. कृष्णाला साथाथांवावर शक येतो आणि ते त्याला पकडून त्याचा वध करतात. पण त्यांना साथाथांवा जवळ मणी भेटत नाही. कृष्णाने निष्पाप साठथांवाचा वध केला म्हणून सगळे यादव जन कृष्णावर क्रोधीत होतात.
काही दिवसानंतर देव ऋषी नारद कृष्ण भागावन  कळे येतात आणि तेव्हा कृष्ण भगवान सगळी हकीकत त्यांना सांगतात. तेव्हा नारद सांगतात कि त्यांनी कदाचित भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र बघितल्या मुळे त्यांना सगळया संकटांना सामोरे जावे लागत आहे. नारद ऋषी कृष्णला संकष्ट चतुर्थीचे व्रत करायला सांगतात. संध्याकाळी गणेशाची पुंजा करून चंद्राला अर्ध्य देऊन पूजा करायला सांगतात. कृष्ण नारदांनी सांगितल्या प्रमाणे व्रत करतात. एके दिवशी गणपती प्रसन्न होऊन त्यांचे सगळे संकट दूर होईल असे वरदान देतात.
एके दिवशी  अक्रुरार यादव नगरीत येऊन सगळ खर सांगतो आणि कृष्णाला ते मणी परत देतो. अश्या प्रकारे त्याच्यावर असलेला चोरीचा आळ निघतो आणि सगळे आनंदाने राहतात.
म्हणून असे म्हंटले जाते कि भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र बघू नये.कृष्ण पक्षातील चतुर्थीला उपवास करावा आणि संध्याकाळी गणेशाचे नमन करून चंद्राला अर्क्या द्यावा. त्यामुळे सगळ्या संकात्पासून मुक्ती होईल.

 समाप्त



READ MORE:-

No comments:

Post a Comment