Saturday, 4 April 2015

HANUMAN JAYANTI




  • मारुतीला हनुमान का म्हंटले जाते ?
एके दिवशा मारुती  खेळत असतान त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो. म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येतांना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो. पण बालक मारोती सूर्याकडे  उडत जातो .हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजावयाचा प्रयत्न करतो कि, ' हे फळ नाही. ते सूर्य प्रकाश देणारा सूर्य आहे. तू जेथून आला आहे तेथे परत जा.' पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो.

हे बघून इंद्र क्रोधीत होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वी वर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असतांना वायूदेवला मारुती मुर्च्चीत पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधीत होतो आणि विचारतो हे कोणी केला पण कोणाकडून उत्तर भेटत नही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते. त्यामुळे  पृथ्वीवर  पशु प्राणी मानव मारू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रम्हा कडे जातात आणि त्यांना सगळी हकीहात कथन करतात. तेव्हा ब्रम्हदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा  ब्रम्हदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात कि कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात कि आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनु ला वज्र ने छाटले  म्हणून मारुतीला हनुमान असे म्हंटले जाईल.


  • हनुमंताचा रंग शेंदरी का आहे ?

एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते कि रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परम भक्त. म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे.


  • हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात? 

हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते .तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. 

READ MORE:-





No comments:

Post a Comment