Wednesday, 15 April 2015

AMBEDAKAR JAYANTI

DA. BABASAHEB AMBEDAKAR JAYANTI /
डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती 

डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती प्रत्येक वर्षी १४ एप्रिल या दिवशी संपूर्ण जगात साजरी केली जाते. हा दिवस डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संसदभवनात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि कही महत्वपूर्ण पार्टीचे नेता डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतात.

डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर श्रेष्ठ चिंतक, ओजस्वी लेखक आणि उत्कृष्ट वक्ता होते. ते भारताचे पहिले कानून मंत्री आहे. ते भारतीय संविधानचे प्रमुख निर्माणकर्ता आहेत म्हणून त्यांना '' FATHER OF INDIAN CONSTITUTION '' असे म्हंटले जाते.
डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ या दिवशी झाला. त्या काळात जातिवाद संपूर्ण देशामध्ये होता. जातीवादामुळे ते संस्कृत भाषा शिकू शकले नव्हते.प्रगतीशील विचारक आणि मानवतावादी बडोदा राज्यचे महाराज सयाजी गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली, पण डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी परत येऊन बडोदा राज्यात काम करावे लागेल अशी शर्त त्यांनी ठेवली. डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी कोलम्बिया या विश्वविद्यालय मधून पहिले एम ए आणि नंतर पी.एच. डी. ची पदवी प्राप्त केली.
पी.एच. डी करत असतांना डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी " भारत का राष्ट्रीय लाभ " या विषयावर काम केलं. त्यांच्या या कामामुळे त्यांची शिष्यवृत्ती अजून एक वर्ष वाढवली.  चार वर्ष पूर्ण झाल्यावर भारतात परत आल्यावर बडोदा राज्यात त्यांना उच्च पद देण्यात आले. परंतु सामाजिक विटंबना मुळे त्यांना नोकरी सोडून मुंबईला जावे लागले. मुंबई ला सिडेनहम विद्यालय मध्ये अर्थशास्त्रचे प्रोफेसर नियुक्त झाले. पण संकीर्ण विचारामुळे तेथे पण त्यांना त्रास झाला. पण ते पुढे जात गेले. त्याचं म्हणण होत कि '' मन के हारे हार है,मन के जीते जीत. '' १९१९ मध्ये ते पुन्हा लंडन परत गेले. तेथे त्यांनी एम. एस. सी., डी. एस. सी. आणि बैरीस्ट्री ची पदवी प्राप्त केली आणि भारतात परत आले.
१९२३ मध्ये उच्च न्यायालयात वकिल म्हणून नियुक्त झाले. तेथे सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले पण ते काम करू लागले. एका मुकादम्यात एका अभियुक्त ला फांसीच्या शिक्षा पासून मुक्तता करून दिली. परंतु उच्च नायालायाच्या न्यायाधीशाने खालच्या न्यायालयात निर्णयाला रद्द केले. तरीदेखील बाबासाहेबांची भरपूर प्रसिद्धी झाली.   
डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा लोकतंत्र यावर खूप विश्वास होता. ते लोकतंत्रला मानवाची एक जीवन पद्धतीचा भाग मानायचे. त्यांच्या नुसार राज्य हे एक मानव निर्मित संस्था आहे.याच सर्वात मोठ कार्य " समाजातील आंतरिक अव्यवस्था आणि बाह्य अतिक्रमण यांची रक्षा करणे आहे. " पण ते राज्य ला निरपेक्ष शक्ती मानत नव्हते. 
भरपूर समस्यांना सामोरे जात आणि कठीण संघर्ष आणि कठोर परिश्रम ने त्यांनी भरपूर प्रगती केली.त्यांच्या याच गुणामुळे संविधानची रचना करतांना, संविधान सभे द्वारे नियोजित समिती मध्ये २९ ऑगस्ट, १९४७ ला "प्रारूप - समिती " जी कि सर्वात महत्त्वाची समिती होती, त्यात त्यांचा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. संविधान सभेत सदस्यांचे प्रश्नांचे निवारण एकदम कुशलता ने दिले. त्यांच्या मुळे संविधान मध्ये  प्रत्येक जाती  वर्गानुसार विभिन्न संवैधानिक व्यवस्था आणि प्रवाधनाचा विचार केला गेला. म्हणून भारतीय संविधान न्याय व्यवस्थेसाठी महत्वाच मानल जाते.


१९४८ साली डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना मधुमेह झाला. त्यामुळे जुन ते आक्टोंबर १९५४ पर्यंत खूप बिमार झाले होते. तेव्हाच ते कमजोर दृष्टी पासून ग्रस्त झाले होते. त्यांनी अंतिम पाण्डूलिपी बुद्ध आणि त्यांची धम्म पूर्ण झाल्यावर तीन दिवसानंतर ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचा मृत्यू झाला. ७ डिसेंबर ला बौद्ध शैली नुसार त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला
जय हिंद जय भारत  





Wednesday, 8 April 2015

SANKATNASHAN GANESH STOTR

SANKATNASHAN GANESH STOTR /
संकटनाशन गणेश स्तोत्र  


|| श्रीगणपतीस्तोत्र ||
साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका |
भक्तीने स्मरतां नित्य आयुःकामार्थ साधती ||१|| 
प्रथम नावं वक्रतुंड दुसरे एकदंत ते | 
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथें गजवक्र तें ||२|| 
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नावं तें | 
सातवे विघ्नराजेंद्र आठवें धूम्रवर्ण तें ||३|| 
नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक | 
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ||४|| 
देवानावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर | 
विध्नभिती नसे त्याला प्रभो ! तू सर्वसिद्धी दे ||५|| 
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | 
पुत्रार्थ्याला  मिळे पुत्र मोक्ष्यार्थ्याला मिळे गती ||६|| 
जपता गणपतीस्तोत्र सहा मासांत हे फळ | 
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७|| 
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | 
श्रीधराने मराठीत पाठण्या अनुवादिले ||८||  
||ओम गं गणपतये नमः ||


READ MORE:-

SANKASHT CHATURTHI VRAT KATHA

SANKASHT CHATURTHI VRAT KATHA /
संकष्ट चतुर्थी व्रत कथा 


एकदा भगवान विष्णू भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला चंद्रच दर्शन करतात म्हणून त्यांना भरपूर संकटाना सामोरे जावे लागते. कृष्ण भगवान यादवांचा राजा सत्राज्रीतानां भेटतात. सत्राज्रीत तपस्या केली  असतांना  सूर्य देव  प्रसन्न होऊन सत्राज्रीताला स्यमंतक मणी वरदान स्वरुपात देतात. त्या मणीची पूजा केली असता एक भार सोन त्याला प्राप्त होत असे. त्या अदभूत मणीमुळे सत्राजीताजवळ भारुपूर संपती असते. म्हणून तो ब्राम्हन भोजन, दान असे खूप करतात. म्हणून कृष्ण भगवान सत्राज्रीताला भेटतात आणि सांगतात कि हे मणी कदाचित सत्राज्रीताचा  नाश करेल म्हणून तो  मणी उग्रसेनला दयावा. पण सत्राज्रित त्यास नकार देऊन तो ते अद्भुत मनी स्वघरी घेऊन जातात. आणि ते तो मणी त्याचा बंधू प्रसेनला दिला.
प्रसेन आणि कृष्ण भगवान हे मित्र असतात. एकदा हे दोघे आपल्या मित्रांसोबत वनात शिकार करायाल जातात. प्रसेन शिकार करत असतांना थकल्यामुळे एका झाडाखाली आराम करायला थांबतो. रात्री त्या मण्याचे तेज बघून एक वाघ तेथे येतो आणि प्रसेन चा वध करतो. आणि तो सिंह तो मणी घेऊन जातो. सिंह मणी घेऊन जात असतांना अतिशय बलाढ्य जांबवान नावाचे अस्वल धावून येतो. हे जांबवान नावाचे अस्वल रामाचा भक्त असतो. जांबवान त्या सिंहाला मारून ते मणी सोबत घेऊन त्याच्या गुहेत जातो आणि त्याच्या मुलीला देतो. 
इकडे कृष्ण आपल्या मित्रांसोबत परत जातो. यादव नगरीत परत गेल्यावर कृष्णावर चोरीचा आळ आणतात कि कृष्णानेच प्रसेंनचा वध केला आहे आणि तो अद्भुत मणी चोराला आहे. चोरीचा आळ खोटा आहे सिद्ध करण्यासाठी कृष्ण त्यांच्या मित्रांसोबत परत वनामध्ये जातात. ते वनात फिरत असतांना त्यांना प्रसेन आणि त्याच्या घोड्याच्या वध झालेला दिसतो. आणि त्याच्या बाजूला सिंहाचे पदचिन्हे दिसतात. कृष्ण भगवान समजतात कि प्रसेनचा वध सिंहाने केला आणि तो मणी घेऊन गेला असावा म्हणून ते सिंहाच्या शोधात पुढे जातात. पुढे त्यांना सिंहाचा वध झालेला दिसतो. आणि त्याच्या बाजूला अस्वलाचे पदचिन्हे दिसतात.म्हणून त्यांना वाटते कि सिंहाला अस्वलाने मारले असावे आणि तो मणी घेऊन गेला असावा. म्हणून कृष्ण अस्वलाच्या शोधात पुढे जातात.
अस्वलाला शोधात असतांना कृष्ण एका गुहेच्या जवळ येतो. ते त्यांच्या मित्रांना तेथेच थांबवून गुहेच्या आत शिरतात. तेथे त्यांना जांबवान अस्वलाची मुलगी जांबवती एका पाळण्यात मणीला झोका देतांना दिसते. ते तिला सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा जांबवती कृष्णाला मणी देऊन लवकर निघून जायला सांगते. पण तेवढ्यात जांबवान अस्वल येतो. आणि जांबवान आणि कृष्ण सोबत युद्ध सुरु होतो. कृष्ण वापस आला नाही म्हणून त्याचे मित्र यादव नगरीत परत जातात. जांबवान आणि कृष्ण यांमध्ये २१ दिवस युद्ध करत होते. युद्ध करत असतांना जांबवान त्याच्या पूर्वजन्म बद्दल विचार करू लागतो. तेव्हा त्याला समजते कि एवढा प्रभावशाली हा पुरुष भगवान विष्णूच असावा. म्हणून तो युद्ध थांबवून कृष्णाला माफी मागतो आणि त्याला तो मणी परत देती. आणि कृष्णाला याचना करतो कि त्याचा पुत्रीचा  पत्नी म्हणून स्वीकार करावा. कृष्ण जांबवतीशी लग्न करून यादव नगरीत परतात आणि सत्राज्रीतला सगळी हकीकत कथन करतात व मणी परत देतात. सत्राज्रीत कृष्णाची माफी मागतो आणि त्याची मुलगी सत्यभामा सोबत विवाह करण्याची प्रार्थना केली. कृष्ण सत्यभामा सोबत विवाह करतो.
कृष्ण आणि सत्यभामा च लग्न झाल म्हणून साथथांवा, अक्रुरार, आणि किरुथावार्मार खुश नसतात. ते सत्राज्रिता वर क्रोधीत असतात. म्हणून ते अदभूत मणी चोरतात. हे वृतांत कळल्यावर कृष्ण भगवान यादव नगरीत परत येतात. साथाथांवा तो मणी अक्रुरार आणि किरुथावार्मार यांना देऊन पळून जातो. कृष्णाला साथाथांवावर शक येतो आणि ते त्याला पकडून त्याचा वध करतात. पण त्यांना साथाथांवा जवळ मणी भेटत नाही. कृष्णाने निष्पाप साठथांवाचा वध केला म्हणून सगळे यादव जन कृष्णावर क्रोधीत होतात.
काही दिवसानंतर देव ऋषी नारद कृष्ण भागावन  कळे येतात आणि तेव्हा कृष्ण भगवान सगळी हकीकत त्यांना सांगतात. तेव्हा नारद सांगतात कि त्यांनी कदाचित भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र बघितल्या मुळे त्यांना सगळया संकटांना सामोरे जावे लागत आहे. नारद ऋषी कृष्णला संकष्ट चतुर्थीचे व्रत करायला सांगतात. संध्याकाळी गणेशाची पुंजा करून चंद्राला अर्ध्य देऊन पूजा करायला सांगतात. कृष्ण नारदांनी सांगितल्या प्रमाणे व्रत करतात. एके दिवशी गणपती प्रसन्न होऊन त्यांचे सगळे संकट दूर होईल असे वरदान देतात.
एके दिवशी  अक्रुरार यादव नगरीत येऊन सगळ खर सांगतो आणि कृष्णाला ते मणी परत देतो. अश्या प्रकारे त्याच्यावर असलेला चोरीचा आळ निघतो आणि सगळे आनंदाने राहतात.
म्हणून असे म्हंटले जाते कि भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र बघू नये.कृष्ण पक्षातील चतुर्थीला उपवास करावा आणि संध्याकाळी गणेशाचे नमन करून चंद्राला अर्क्या द्यावा. त्यामुळे सगळ्या संकात्पासून मुक्ती होईल.

 समाप्त



READ MORE:-

SANKASHT CHATURTHI

SANKASHT CHATURTHI/
संकष्ट चतुर्थी 



प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असते. चतुर्थीला भगवान गणेशाजीचां जन्म झाला होता. पौर्णिमा नंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी अस म्हंटले जाते. आणि अमावास्या नंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हंटले जाते.
कृष्ण पक्षात  येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास ठेवल्यानंतर सध्यांकाळी चंद्रोदय झाल्यानंतर श्री गणेशाची पूजा केली जाते. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्क्य दिले जाते. संकष्टी चतुर्थीला संकटहरा चतुर्थी असेही म्हंटले जाते. जो हे व्रत करते त्याचे सगळे संकट दूर होते असे मानले जाते.
भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला चंद्राचे दर्शन करू नये असे मानले जाते. जर असे झाले तर त्याला भरपूर संकटाना सामोरे जावे लागले असे मानले जाते. 



READ MORE:-

Saturday, 4 April 2015

HANUMAN JAYANTI




  • मारुतीला हनुमान का म्हंटले जाते ?
एके दिवशा मारुती  खेळत असतान त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो. म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येतांना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो. पण बालक मारोती सूर्याकडे  उडत जातो .हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजावयाचा प्रयत्न करतो कि, ' हे फळ नाही. ते सूर्य प्रकाश देणारा सूर्य आहे. तू जेथून आला आहे तेथे परत जा.' पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो.

हे बघून इंद्र क्रोधीत होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वी वर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असतांना वायूदेवला मारुती मुर्च्चीत पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधीत होतो आणि विचारतो हे कोणी केला पण कोणाकडून उत्तर भेटत नही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते. त्यामुळे  पृथ्वीवर  पशु प्राणी मानव मारू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रम्हा कडे जातात आणि त्यांना सगळी हकीहात कथन करतात. तेव्हा ब्रम्हदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा  ब्रम्हदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात कि कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात कि आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनु ला वज्र ने छाटले  म्हणून मारुतीला हनुमान असे म्हंटले जाईल.


  • हनुमंताचा रंग शेंदरी का आहे ?

एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते कि रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परम भक्त. म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे.


  • हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात? 

हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते .तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. 

READ MORE:-





HANUMAN BIRTH STORY

HANUMAN BIRTH STORY/
हनुमान जन्मकथा 


एक अंजना नावाची अप्सरा होती. ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची. तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हव ते मागायला सांगतात. तेव्हा अंजना सांगते कि, 'हे देवा तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या.' तेव्हा ब्राम्हजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रुपामध्ये खेळत असतांना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले. तीला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले. त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली. त्या ऋषिनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला कि ती कोणाच्या प्रेमात पडल तर त्याच क्षणी ती  वानर बनेल.'
तेव्हा तीने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली कि त्यांनी त्याचं श्रापासून मुक्ती करावी. तेव्हा ते ऋषी तिला सांगितल कि, 'मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही.तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानर मुखी माणूस असेल.'
हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात कि, 'हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही. पण तुला एक सांगतो कि तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तेथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्ती साठी भगवान शिवची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता भेटेल.'
अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते. एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो. ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहताच क्षणी अंजनाचे वानरमध्ये रुपांतर होते. हे बघून अंजना रडू लागते. तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपुस करू लागतो. तेव्हा अंजना तिच्या श्राप बद्दल सांगते आणि त्याच्या कडे बघते तेव्हा तिला तो वानारमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो कि तो माणूस नाही आहे. तो वानरांचा राजा केसरी आहे. त्याला भगवान शिव कडून वरदान भेटलं आहे. तो तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले. 
अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात. आणि ते तेथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रम्हा ने सांगितल्या सारख अंजनाने पुत्र प्राप्ती साठी भगवान शंकराची पूजा करते. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात कि ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तीची मुक्तता होईल.
एके दिवशी अंजना भगवान शिवची पूजा करत असते  आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पृत्रप्राप्ती साठी यज्ञ करत असतो. तेव्हा अनिदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रुपात राजाला पायास दिते आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला पायास देत असतांना एक घार थोड पायास घेऊन उडते . ती उडत वनातून जात असतांना अचानक वादळ सुटते. हे वादळ  वायुदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायास ओंजळ करून शिव मंत्र जपत असणारया अंजनीच्या हातात पडते. भगवान शिवचे प्रसाद समजून अंजनाने ते पायास प्राशन करते..
काही दिवसानंतर अंजनाने एक वानर मुखी पुत्राचा जन्म होतो. हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो. पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते  आणि ती ब्राम्ह्लोकात परत निघून जाते.
हनुमन्त जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे. म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. .

READ MORE:-


HANUMAN JAYANTI

HANUMAN JAYANTI/
हनुमान जयंती 

हनुमान जयंती चैत्र महिन्यात साजरा केली जाते. हनुमान जयंती हनुमंताचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. हनुमंताला पवनपुत्र, पवन कुमार, बजरंगबली, महावीरा, वानरांचा देवता असेही म्हंटले जाते.

हनुमान बालब्रम्ह्चारी होते. हनुमंताने पूर्ण जीवन श्रीरामाची पूजा केली. हनुमंताला मारुती असेही म्हंटले जाते. मारुतीराया खूप पराक्रमी होते. हनुमंताने जंबू, माली, अक्ष, धूम्राक्ष निकुंभ या मोठ्या वीरांचा नाश केला. समुद्रावरून उड्डाण करून लंकादहन केले आणि संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणले. 



READ MORE:-



Thursday, 2 April 2015

APRIL 2015


एप्रिल २०१५ 
चैत्र /वैशाख १९३७ 




READ MORE:-

  • प्रदोष 
  • अनंग त्रयोदशी 
  • महावीर जयंती 
  • दमनक चतुर्थी 
  • गुड फ्रायडे 
  • छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी 
  • इस्टर संडे 
  • करिदिन 
  • जागतिक आरोग्य दिन 
  • महात्मा जोतीबा फुले जयंती 
  • भारतरत्न डा आंबेडकर जयंती 
  • वरूथिनी एकादशी 
  • शिवरात्री 
  • दर्श अमावास्या 
  • अक्षय्य तृतीया 
  • दुर्गाष्टमी 
  • मोहिनी एकादशी  




HOME                                                                     BACK