Friday, 16 October 2015

STORY OF NAVRATRI



रामायणातील कथा 



राम अवतारात देवी सिताचे रावणाने हरण करून लंकेला नेले. तेव्हा प्रभू श्री रामने रावनासोबत युद्ध केलं. युद्ध करायच्या आधी ब्रम्हाजीने श्रीरामांना देवी चंडीचे पूजन करायला सांगितले. आणि देवीला एकशे आठ नीलकमल अर्पित करायला सांगितले. दुसरीकडे रावणाने पण युद्धात विजयी होण्यासाठी आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून चंडीपाठ सुरु केलं. रावणाने त्याच्या शक्तीच्या सहायाने श्रीरामांचे पूजा सामग्रीमधून एक नीलकमल गायब केलं. तेव्हा श्रीरामांना ज्ञात झाल कि लोक त्यांना "कमलनयन नवकंच  लोचन " म्हणतात. म्हणून त्यांनी त्याचं एक नेत्र त्या फुलाच्या ऐवजी अर्पण करायचं ठरवलं. आणि ते तीक्ष्ण बाणाने त्यांचे एक नेत्र काढत असतांना देवी प्रसन्न होऊन प्रकट झाली. आणि श्रीरामांना विजयश्री चा आशीर्वाद दिला. लंकेत रावण चंडीपाठ करणाऱ्या ब्राम्हणाची सेवा करू लागला. तेथे हनुमान ब्राम्हण बालकाच्या रुपात गेले. त्या ब्राम्हण बालकाची सेवा बघून त्याला एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा बालकरुपी हनुमानने म्हंटले कि, " जर तुम्ही माझी सेवा बघून प्रसन्न आहे तर तुम्ही मला यज्ञाच्या मंत्रातील एक अक्षर बदलू द्या." ब्राम्हणांना याचा अर्थ कळला नाही आणि त्यांनी त्यांना ततास्तु म्हंटले. तेव्हा हनुमानाने मंत्रातील " जयदेवी ...भुर्तीहरिणी " या शब्दातील ' ह ' एवजी ' क ' उच्चारावे असे सांगितले. भुर्तीहरिणी म्हणजे प्राण्याची पिडा दूर करणारी  आणि ' कारिणी ' म्हणजे प्राण्यांवर पिडा करणारी. असे केल्यामुळे चंडीमाता रावणावर रुष्ट झाली. अश्याप्रकारे श्रीरामाने चंडीपाठ करून युद्ध लढायला लंकेला गेले आणि दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला रावणाचा वध केला. तो दिवस दसरा म्हणजेच विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. 


महिषासुराची कथा 


नवरात्रीच्या बाबतीत अजून एक कथा आहे कि देवी दुर्गा ने भैस रुपी असुर म्हणजेच महिषासुर याचा वध केला. पौराणिक कथानुसार महिषासुराची तपस्या बघून सर्व देवतांनी त्याला अजय होण्याच वरदान दिल. पण महिषासुर त्याचा उलटा उपयोग करू लागला. तो सगळ्या देवांचे अधिकार घेऊन स्वतः स्वर्गालोकवर  राज्य करू लागला. तेव्हा देवातानी क्रोधीत होऊन देवी दुर्गाची रचना केली. असे मानले जाते कि सगळ्या देवांनी त्यांचे अस्त्र देवी दुर्गाला दिले. या नवरात्री च्या दिवसात देवी दुर्गा आणि महिषासुराचा भीषण युद्ध झाले आणि सर्वात शेवटी देवीने महिषासुराचा वध केला.

HOME                                                                     BACK

No comments:

Post a Comment