Friday, 11 September 2015

POLA


पोळा 


पोळा हा सण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील अमावास्येला पोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. पोळा हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण आहे. दक्षिण भारतात खास कर्नाटकात पोळा सणाला बेंदूर असेही म्हणतात.


या दिवशी शेतकरी बैलांना सजवून रंगवून त्यांची पूजा करतात. गावातील सगळे शेतकरी त्यांची बैलजोडी गाजत वाजत गावाच्या बाहेर आणतात.  तेथे आंब्याच्या पानाचे तोरण लावले असते. सगळ्या बैलजोडीची शर्यत लावली जाते. बैलजोडींची पूजा करून पोळा फुटतो. जी बैलजोडी जिंकते त्याच्या मालकाला इनाम भेटते. नंतर त्यांना मारुतीच्या मंदिरात नेऊन पूजा करतात. मग घरी नेऊन पूजा करून पुरणपोळीच नैवेद्य दिल जाते.

पोळ्या च्या दुसरया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान मुल त्यांचे लाखडी बैल म्हणजेच नंदीला सजवतात. सगळे मुल ठरलेल्या ठिकाणी  त्यांच्या नंदी ला घेऊन जातात. तेथे आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते. त्यांची तेथे पूजा करतात वा शर्यत लावली जाते. तोरण तुटल्यावर जो मुलगा शर्यतीत जिंकतो त्याला इनाम दिला जातो. त्यानंतर सगळे मुला प्रत्येकाच्या घरी जातात. त्यांच्या नंदीची पूजा करून मुलांना बोजरा म्हणजे खाऊ किंव्हा पैसे दिले जाते.  


HOME                                                                     BACK

No comments:

Post a Comment