Wednesday, 16 September 2015

HARTALIKA VRAT KATHA


 हरतालिका व्रत कथा 


हरतालिका व्रताचे कथानक असे आहे कि, हिमालयाचा राजा हिमवान याला एका कन्या असते. हिमवान म्हणजे पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव पार्वती असे ठेवण्यात येते. पार्वती मोठी झाल्यावर पार्वतीचे लग्न कोणासोबत करावे अशी काळजी राजा हिमवान ला असते. तेव्हा नारद मुनी भगवान विष्णुंसाठी लग्नासाठी मागणी घालण्यासाठी येतात. हे बघून राजा हिमवान खूप आनंदित होतो. राजा हिमवान पार्वतीला ही बातमी सांगतो. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती मानले असते. 
त्यामुळे पार्वती राजा हिमवनला मैत्रिणीकडून निरोप पाठवते कि, "मी कैलासराणा शंकराला मनोमन पती मानले आहे. तुम्ही जर दुसऱ्या कोणाबरोबर विवाह करून दिला तर मी जीव देईल" अस निरोप पाठवून पार्वती आपल्या मैत्रिणी सोबत अरण्यात निघून जाते. तिथे ती घोर तपश्चर्या करते. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करते. प्रथम ती झाडाची कोवळी पाने खावून राहते. पुढे ती तेही खात नही. तिच्या या तपश्चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि पार्वतीला इच्छीत वर मागण्यास सांगतात. पार्वती म्हणते कि, " हे शिवशंकर, तुम्ही जर माझ्या तपस्येमुळे प्रसन्न झाले असाल तर माझे पती व्हा." भगवान शिवशंकर "तथास्तु" म्हणून निघून जातात. 
पार्वतीचा  शोध घेत राजा हिमवान त्या अरण्यात य्रतो. आणि तेव्हा तो पार्वतीला घर सोडून अरण्यात येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारतो. तेव्हा ती तिने भगवान शिवशंकरांना मनोमन पती मानले आहे आणि त्यांनी दिलेल्या वराबद्दल पण सागते. पार्वतीचा दृढ निश्चय बघून राजा हिमवान श्री भगवान शिवशंकरासोबत तिचा विवाह करून देतो.
अश्या प्रकारे पार्वतीच्या निष्ठा आणि श्रद्धे मुळे पार्वतीचा विवाह भगवान शिवशंकरा सोबत होतो. आणि पार्वती इच्छित पती आपल्या मैत्रिणीच्या साह्याने प्राप्त करते. तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया असते. म्हणून या दिवशी वैवाहित स्त्रिया आणि कुमारिका हरतालिका हा सण मनोभावे साजरा करतात. 


HOME                                                                     BACK

No comments:

Post a Comment