शिवरात्रि या सणाच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. शिवरात्री म्हणजे " शिवाची रात्र ". शिवरात्री हा सन वर्षातून बारा वेळा येतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी ला येते. पण माघा महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्री महत्वाची मानली जाते. या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.
महाशिवरात्री या दिवशी मह्देवांचा देवी पार्वती आदिशक्ती सोबत विवाह झाला. त्रयोदशीला दिवसभर उपास आणी रात्रभर जागरण करून चतुर्दशीला सकाळी उपास सोडतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवाची " लीन्गोद्भावामुर्ती किवा जोतिर्लिंग " या विशेष रुपाची पूजा केली जाते.