Wednesday, 26 August 2015

RAKSHABANDHAN






रक्षाबंधन किंव्हा राखी हा सण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा करतात. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्य साठी आणि भावाला सुख लाभो अशी देवाला प्रार्थना करते. तसेच भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. राखी कच्चा धागा किंव्हा रेशमी धागा, सोने, चांदी, डायमंड या पासून बनवली जाते.





पुरातन काळापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. पुरातन काळात एकदा दानव आणि देवांमध्ये युद्ध सुरु होत. दानव युद्ध जिंकणार होते. तेव्हा देवराज इंद्र देवगुरु बृहस्पती जवळ गेले. तेव्हा इंद्रदेवांची पत्नीने भगवान विष्णूने देलेला पवित्र रेशीम धागा इंद्राच्या हातावर बांधला. इंद्र त्या लढाईत जिंकले. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवसापासून श्रावण पौर्णिमेला धागा बांधण्याची प्रथा सुरु झाली असे मानले जाते. पुराणात अश्या बऱ्याच कथा आहेत जेथे रक्षाबंधन या  सणाचा उल्लेख केलेला आहे. 



HOME                                                                  BACK

Tuesday, 18 August 2015

NAGPANCHAMI


नागपंचमी 




श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी या दिवशी नागदेवता किंव्हा नागाची पूजा केली जाते. हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करतात.
या दिवशी भाजी चिरायचे नाही, तवा वापरायचा नाही, असे म्हंटले जाते. तसेच नागपंचमीला शेतकरी शेत नांगरत नही .कारण जे  जीव जंतू शेताला नुकसान करतात त्यांचा साप नाश करून शेताच रक्षण करतो. तसेच सापाला शेतकर्याचा मित्र देखील म्हंटले जाते.
तसेच श्रीकृष्ण अवतारात श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पत्रातून सुरक्षित वर आले होते. तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी होता. म्हणून या दिवसापासून नागाची पूजा या दिवशी केली जाते असे मानल्या जाते..



HOME                                                                  BACK



Friday, 14 August 2015

INDEPENDENCE DAY

स्वतंत्रता दिवस
१५ ऑगस्ट 



१५ ऑगस्ट हा भारताचा " राष्ट्रीय सण " आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटीश साम्राज्या पासून स्वतंत्रता मिळाली होती. म्हणून हा दिवस " भारतीय स्वतंत्रता दिवस " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. तसेच संपूर्ण भारतात ठिकठिकाणी शाळा, कार्यालयात ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम करून स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ ला जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि त्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोर दरवाजावर ध्वजारोहण केले.


स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद झाले. डा बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताचे संविधान लिहिण्यास खूप मोठा वाट आहे. 


HOME                                                                  BACK

Wednesday, 12 August 2015

SHRAVAN MASS

श्रावण महिना 



श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यापासून पाचवा महिना आहे. या महिन्याला वर्षा ऋतू असे पण म्हंटले जाते.या महिन्यात भरपूर पाऊस येतो. भारताच्या प्रत्येक भागात या महिन्यात व्रत आणि धार्मिक कृत्य करतात. तसेच या महिन्यात भरपूर सण साजरे केले जातात. या महिन्यातील प्रत्येक भगवान  महादेव यांची पूजा पूजेला खूप महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवारला श्रावण सोमवार म्हणतात आणि या दिवशी भगवान महादेव यांची पूजा केली जाते. १६ सोमवारचे व्रत या महिन्यातील पहिल्या सोमवार पासून सुरु केले जाते.

हिंदू पंचांगानुसार देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास मानला जातो. श्रावण महिना चातुर्मासातील पहिला महिना मनाला जातो. श्रावण महिना हा चातुर्मासातील सर्वात शुभ महिना आहे. 
आषाढी ते कार्तिकी या काळात देव निद्राधीन असतात. म्हणूनच या महिन्यात जास्तीत जास्त व्रत वैकले करून मनुष्य प्राणी सदाचरणी होऊन देवाचे कृपा छत्र आपल्यावर राहावे म्हणून प्रयत्न करतो.

HOME                                                                     BACK





AUGUST 2015


निज आषाढ / श्रावण 

शके १९३७ 




READ MORE:-

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी 
  • कमिका एकादशी
  • भौमप्रदोष 
  • शिवरात्री
  • दीपपूजा 
  • श्रावण सोमवार 

HOME                                                                     BACK