Wednesday, 15 July 2015

JULY 2015


अधिक आषाढ / निज आषाढ

शके १९३७ 


READ MORE:-

  • विश्वजनसंख्या दिन
  • कमला  एकादशी
  • शिवरात्री
  • करिदिन
  •  रमजान ईद
  • दुर्गाष्टमी
  • देवयानी आषाढी  एकादशी
  • गुरुपौर्णिमा


HOME                                           BACK



ADHIK MAS

अधिक महिन्याचे महत्त्व



अधिक मास यास मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हंटले जाते. दर तीन वर्षानंतर अधिक मास येतो. या वर्षी जून १७ पासून ते १६ जुलै पर्यंत अधिक आषाढ म्हणून अधिक मास गणला गेला आहे. 
पृथ्वीला सूर्या भोवती फिरत असतांना एक प्रदक्षिणा मारायला ३६५ दिवस ९ मिनिटे ३० सेकंद ( म्हणजेच ३६५.२५६४ दिवस ) लागतात. तसेच चंद्राला  एक प्रदक्षिणा मारायला २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे आणि ४ सेकंद ( म्हणजेच २९.५३०६  दिवस ) एका अमावास्या पासून दुसरया अमावास्या पर्यंत लागतात. म्हणजेच एक चंद्रमासात ३० किंव्हा ३१ दिवस असतात. एका चंद्र्वर्षात ३५४.३६७२ दिवस असतात. म्हणून सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यात ११ दिवसांचा फरक येतो. म्हणून प्रत्येक  चन्द्र्मास  ११ दिवस आधी येतो. तीन वर्षा नंतर हा फरक ३३ दिवस म्हणजेच एक महिना अस होतो. याच महिन्याला अधिक मास असे म्हणतात.
भारतीय हिंदू केलेंडर चंद्र्मासावर आहे. प्रत्येक चंद्रवर्षात १२ महिने असतात. चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यांमधे मेळ घालण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनंतर अधिक मास गणला जातो. अधिक महिन्याला त्याच्या पुढील महिन्याचे नाव देतात. जसे या वर्षी अधिक आषाढ आहे. सामान्यता प्रत्येक चंद्र मासात एक सौर संक्राती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्राती घडत नाही, म्हणजेच जो चंद्रास संपूर्णपणे दोन संक्रातीच्या मध्ये येतो, तो अधिक मास गणला जातो. ज्या सूर्याची मेष संक्राती चैत्र अमावास्येला घडली व त्याची वृषभ संक्राती वैशाखात न होता त्यापुढील महिन्यात आली, तर संक्रतीविहीन मास अधिक वैषक ठरेल. आणि त्यापुढचा महिना तर निज वैशाख ठरेल.  
चैत्र , ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, अश्विन १४१ वर्षांनी आणि कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास होतो. भाद्रपादापर्यंत च्या मासाना अधिक मास म्हणतात. अधिक मासामध्ये विष्णू भगवान ची पुंजा केली जाते. तसेच या महिन्या दानधर्म आणि नदीमध्ये स्नान करण्यास अधिक महत्त्व आहे.